हिंदूंवरील जिहादी आक्रमणे अन् महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीचे भांडुप येथे आंदोलन !
भांडुप (मुंबई), १३ ऑगस्ट (वार्ता.) – देशभरात विविध ठिकाणी हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘धार्मिक पक्षपात’ या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर जिहादी आक्रमणे होत आहेत. शासन हिंदूंना संरक्षण देण्यास न्यून पडत आहे, तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे कार्य हे पक्षपाती असून हिंदूंच्या सणांच्या वेळीच ते कारवाई करतात आणि अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी झुकते माप दिले जाते, असा आरोप या वेळी करण्यात आला. निधर्मी शासन पद्धतीत अशा प्रकारे धार्मिक पक्षपात करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह, सनातन संस्था, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विश्व हिंदु परिषद यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन आणि घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.