नंदुरबार जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदने !
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !
नंदुरबार, १३ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या वर्षी सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदन सादर करण्यात आले.
समितीच्या वतीने नंदुरबार येथील पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील या प्रशासकीय अधिकार्यांसह ४ शाळा प्रशासनांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सर्वश्री सुमित परदेशी, गौरव धामणे, आकाश गावित, सौ. धनश्री कुलकर्णी, कु. उमा कदम हे धर्मप्रेमी उपस्थित होते.