दहावा आरोपी शेख अकील शेख छोटू याला अटक !
उमेश कोल्हे हत्या प्रकरण
अमरावती – शहरातील औषधविक्रेते उमेश कोल्हे यांची २१ जून या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ‘राष्ट्रीय अन्वेषण पथका’ने (‘एन्.आय.ए.’ने) १२ ऑगस्ट या दिवशी शेख अकील शेख छोटू (वय २८ वर्षे) याला अटक केली आहे. तो या प्रकरणातील अटक झालेला दहावा आरोपी आहे. तो शहरातील लाल खडी परिसरातील रहिवासी आहे. उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. शेख अकील हा इतर आरोपींसमवेत या कटात सहभागी असल्याची माहिती ‘एन्.आय.ए.’ने दिली.