रिझर्व्ह बँकेकडून रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित !
पुणे – कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने रूपी सहकारी बँक अडचणीत आली होती. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे. वर्ष २०१७ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा परवाना रहित झाल्याने बँकेचे ठेवीदार, कर्मचारी आणि बँकेची संपत्ती यांचे काय होणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.