संभाजीनगर येथे ‘ईडी’विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने लावलेले फलक काढले !
संभाजीनगर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे जय विश्वभारती कॉलनी शाखाप्रमुख रोहन आचलिया यांनी रोपळेकर, विवेकानंद चौक येथे ‘ईडी’ कारवाईविषयी फलक लावले. ते भाजप पदाधिकार्यांनी २४ घंट्यांत काढल्याचा आरोप त्यांनी केला. रोहन आचलिया म्हणाले की, हे फलक लावण्यासाठी महापालिकेची अनुमती घेतली नव्हती; पण अतुल सावे यांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर फलक असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते काढले असावेत; कारण माझ्या फलकाच्या जागी त्यांनी सावे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.