शिंदे गटाचेही सेनाभवन दादरमध्येच होणार !
मानखुर्द येथे शिंदे गटाचे पहिले कार्यालय
मुंबई – मानखुर्द येथे शिंदे गटाचे पहिले कार्यालय झाले आहे. राहुल शेवाळे यांचे हे कार्यालय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सेनाभवन दादरमध्येच बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती सदा सरवणकर यांनी १२ ऑगस्ट या दिवशी दिली होती. सरवणकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम गतीने चालू होणार आहे. स्वतंत्र शाखा उभारून शाखाप्रमुखांची घोषणा करण्यात येणार आहे. शिंदे यांचे कार्यालय दादरमध्येच होणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शाखा काम करणार आहेत.