‘१०० वर्षांनी शत्रूत्व ठेवणार’, असे अप्रत्यक्षपणे सांगणारा पाकिस्तान !
‘भारतासमवेतच्या संबंधांमध्ये कटुता आल्याने पाकला शेकडो कोटी रुपयांची हानी सोसावी लागत आहे. एकूणच पाकचे आर्थिक स्तरावर धिंडवडे निघाले आहेत. अशातच पाकने बनवलेल्या त्याच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा काही भाग घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘शेजारी देशांसमवेत चांगले व्यावसायिक संबंध बनवण्यास प्राधान्य दिले जाईल’, असे म्हटले आहे. या धोरणामध्ये भारताशी पुढील १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.’