माँटीनीग्रो देशात झालेल्या गोळीबारात ११ जण ठार
पॉडगॉरिका (माँटीनीग्रो) – कौटुंबिक वादामुळे झालेल्या गोळीबारात पूर्व युरोपातील माँटीनीग्रो देशात असलेल्या सेटिंजे येथे ११ जण ठार झाले, तर ६ जण घायाळ झाले. सरकारी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदुकधार्याने केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ३ जण ठार झाले, तर त्या वेळी तेथून चाललेल्या ८ पादचार्यांचाही या आक्रमणात मृत्यू झाला.
At least 11 people were killed, including two children, in a deadly mass shooting in Montenegro's southern city of Cetinje on Friday, according to state media RTCG. https://t.co/AK5GPZEV24
— CNN International (@cnni) August 12, 2022
३४ वर्षीय बंदुकधार्याला एका नागरिकाने गोळीबार करून ठार मारल्यावर हा प्रकार थांबला. पंतप्रधान द्रिटॅन अॅबेझोविक यांनी या घटनेविषयी तीन दिवस शोक प्रकट करण्याचे घोषित केले आहे.