मंगळुरू (कर्नाटक) येथील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या काढून कचरापेटीत फेकल्या !
पालक आणि हिंदु संघटनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर रक्षाबंधनाला अनुमती !
मंगळुरू (कर्नाटक) – येथे कटिपल्ला भागातील इन्फँट मेरी या ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राखी काढून ती फेकल्याच्या प्रकरणी हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि पालक यांनी शाळेला विरोध केला. पालकांनी मोठ्या संख्येने शाळेत जाऊन व्यवस्थापकांना जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस शाळेत पोचले आणि त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटकः ईसाई मिशनरी स्कूल में राखियां खुलवाकर कूडेदान में फेंकी, मचा बवाल#Karnataka #RakhiControversyhttps://t.co/jIFK3dzjgo
— Patrika Hindi News (@PatrikaNews) August 13, 2022
१. पालकांचा प्रश्न आहे की, जर शाळेला ‘फ्रेंडशिप डे’वर (‘मैत्री दिवसा’वर) आक्षेप नसेल, तर रक्षाबंधनानिमित्त बांधण्यात येणार्या राखीला अनुमती देण्यात काय अडचण आहे ?
२. शाळेचे मुख्याध्यापक संतोष लोबो पालकांना म्हणाले, ‘‘मला या घटनेविषयी काहीही ठाऊक नाही. पोलीस जेव्हा माझ्याकडे आले, तेव्हा मला याची माहिती मिळाली. मी येथे नवीन आलो आहे. गेली ६ वर्षे मी केरळमध्ये राखी बांधून घेत होतो. आम्हाला अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. आम्ही नेहमीच रक्षाबंधनाचे स्वागत करतो. ही एक चांगली परंपरा आहे. केरळमध्ये हिंदु भाऊ मेरीच्या मनगटावर राखी बांधत होते. यापुढे शाळेमध्ये रक्षाबंधनाला विरोध होणार नाही. मी मुलांना याविषयी सांगीन.’’
संपादकीय भूमिकाख्रिस्ती मिशनर्यांच्या शाळेत हिंदूचे सण आणि धार्मिक आचरण यांना विरोध, ही काही नवीन घटना नाही. त्यामुळे हिंदूंच्या होणार्या अशा दमनाच्या विरोधात आता कायदा करणेच आवश्यक ! |