भारतात ‘व्हि.एल्.सी. मीडिया प्लेअर’ या चिनी संगणकीय प्रणालीवर बंदी !
मुंबई – भारतात चलचित्र (व्हिडिओ) पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या ‘व्हि.एल्.सी. मीडिया प्लेअर’ या चिनी संगणकीय प्रणालीवर बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकार किंवा ‘व्हि.एल्.सी.’ आस्थापन यांनी आतापर्यंत यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी ‘मीडियानेम’च्या अहवालानुसार ‘व्हि.एल्.सी. मीडिया प्लेअर’वर भारतात २ मासांपूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वीही भारत सरकारने ‘टिकटॉक’, ‘पब्जी भ्रमणभाष खेळ’, ‘हॅलो’ यांसारख्या चिनी ‘अॅप’वर बंदी घातली आहे. या प्रणाली त्यांच्या वापरकर्त्यांची माहिती चीनला पुरवत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली होती.
VLC Media Player banned in India, website and VLC download link blocked https://t.co/PxKhe7AOYb
— IndiaTodayTech (@IndiaTodayTech) August 12, 2022