कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !
एन्.आय.ए.च्या अन्वेषणात माहिती उघड
नवी देहली – जिहादी आतंकवाद्यांना पैसा पुरवण्याच्या काही प्रकरणांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) अन्वेषण करत आहे. या अन्वेषणातून पाकिस्तानात लपलेला आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याची टोळी भारतातून कोट्यवधी रुपये ‘हवाला’ (अरबी आणि दक्षिण आशिया येथील देश पैशांचे हस्तांतर करण्यासाठी वापरत असलेली एक विशिष्ट प्रणाली) आणि ऑनलाईन माध्यमे यांद्वारे जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि अल्-कायदा यांना थेट पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये मुंबईतील सलीम फ्रुट हा नुकताच पकडण्यात आलेला या टोळीतील गुंड साहाय्य करत होता, अशी माहिती मिळाली आहे.
From extorting money for terrorism to ties with JeM, Al Qaeda etc: NIA arrests Salim Fruit, brother-in-law of D-Company’s Chota Shakeel: Detailshttps://t.co/gm49a7TKTi
— OpIndia.com (@OpIndia_com) August 5, 2022
महंमद सलीम महंमद इक्बाल कुरेशी उपाख्य सलीम फ्रुट याला ४ ऑगस्टला मुंबई सेंट्रलच्या मीर अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकापाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ? |