पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणार्या दोघांना अटक !
चिंचवड (पुणे) – पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणार्या दोघांना चिंचवड पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ लाखांचा ऐवज शासनाधीन केला आहे. दीपक बनसोडे (वय ३१ वर्षे) आणि श्रीमंत सुरवसे (वय २९ वर्षे) अशी कह्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दुचाकी चोरण्यासमवेतच पोलीस असल्याचे खोटे सांगून नागरिकांना फसवत होते. ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार यांच्या पथकाने केली.
संपादकीय भूमिकापोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! दर काही दिवसांनी अशी प्रकरणे उघड होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? अशा तोतया पोलिसांना कठोर शिक्षा होणे ओवश्यक आहे ! |