हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर
देहली – केंद्र सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य मान ठेवण्यात यावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील नगरपालिकेच्या शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये संजय गोयल आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ईशा खोसला यांचे स्वीय साहाय्यक सचिन शर्मा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये ‘या उपक्रमानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक जपण्यात यावेत, तसेत प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येऊ नये’, अशीही विनंती करण्यात आली आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
संजय गोयल यांनी समितीच्या अभियानाचे कौतुक केले आणि साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी ‘देहलीच्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये जागृती करण्यात येत आहे’, असे सांगितले.