लालसिंह चढ्ढा चित्रपटाच्या विरोधात कोल्हापुरात भाजपच्या वतीने आंदोलन !
कोल्हापूर, १२ ऑगस्ट (वार्ता.) – आमीर खान देशविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने लालसिंह चढ्ढा चित्रपटाच्या विरोधात पद्मा चित्रपटगृहाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी चित्रपटाच्या पोस्टरवर काळी शाई फेकण्यात आली. या संदर्भात भाजपचे कार्यकर्ते सचिन तोडकर म्हणाले, ‘‘अमीर खान हा देशातील लोकांमुळेच मोठा झाला. असे असूनही तो देशविरोधी भूमिका घेतो, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत. जे जे अभिनेते देशविरोधी भूमिका घेतात आणि पाकिस्तानचे समर्थन करतात त्या सगळ्यांसाठीच ही चेतावणी आहे.’’