‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शीख यांंचा अवमान ! – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसर
चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे मॉन्टी पनेसर यांचे आवाहन !
लंडन (ब्रिटन) – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसर यांनी अभिनेते आमीर खान यांचा ११ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटावर टीका केली आहे. या चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शीख यांंचा अवमान करण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. या चित्रपटाचा प्रदर्शनापूर्वीपासूनच भारतात यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. लालसिंह चढ्ढा हा चित्रपटाचे कथानक वर्ष १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूड चित्रपटावर आधारित आहे. ‘फॉरेस्ट गंप’ ही अल्प बुद्ध्यांक असलेली व्यक्ती असते. तिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
मॉन्टी पनेसर यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘फॉरेस्ट गंप’ ही व्यक्तीरेखा अमेरिकी सैन्यात भरती होते; कारण अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धामध्ये गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने ज्यांची बुद्धीची क्षमता अल्प होती, अशा तरुणांनाही सैन्यात भरती केले होते. (‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचे कथानक जसेच्या तसे उचलल्याने लालसिंह चढ्ढा) हा चित्रपट भारतीय सैन्य आणि शीख यांचा अवमान करतो. हा अपमान लज्जास्पद आहे.’
सौजन्य अल्फा न्युज
संपादकीय भूमिकाजे इंग्लंडच्या शीख खेळाडूला वाटते ते भारतातील किती शिखांना आणि भारतियांना वाटते ? |