देहलीमध्ये २ सहस्र जिवंत काडतुसांसह ६ जणांना अटक
नवी देहली – देहली पोलिसांनी दारूगोळ्याची तस्करी करणार्या टोळीला पकडून त्यांच्याकडून २ सहस्र जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. आनंद विहार भागातून दोन बॅगांसह ही काडतुसे जप्त करण्यात आली. ‘या काडतुसांचा कुठे पुरवठा केला जाणार होता ? आणि याचा वापर कुठे होणार होता ?’ हे या प्रकरणाच्या पुढील चौकशीत स्पष्ट होईल.
Delhi: Ammunition smuggling syndicate busted days before independence day celebrations, 2000 live cartridges recoveredhttps://t.co/9TpjUyoXEN
— OpIndia.com (@OpIndia_com) August 12, 2022