पुणे येथे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचार्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे – ओळखीचा अपलाभ घेत व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्याच्या निमित्ताने १९ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी ज्योती गायकवाड आणि पती शंकर गायकवाड या दोघांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी सदाशिव नलावडे यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. नलावडे यांचे मोटार दुरुस्तीचे दुकान आहे, तर गायकवाड यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. ओळखीचा आणि पदाचा गैरवापर करत नलावडे यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्ट महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांचे नातेवाइक यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |