हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखा, तसेच सनातन संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन !
मुंबई – रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, आमदार अजय चौधरी, शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी राखी बांधली. शिवसेनेचे आमदार श्री. सुनील शिंदे रणरागिणी शाखेच्या सौ. शर्मिला बांगर यांनी राखी बांधली. भाजपचे आमदार श्री. राम कदम यांना सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी, तर भाजपचे आमदार श्री. मिहिर कोटेचा यांना सनातन संस्थेच्या सौ. वनिता धोत्रे यांनी राखी बांधली. रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना, तसेच शेकापचे बाळाराम पाटील यांनाही राखी बांधण्यात आली.