चिंचपुरा (जिल्हा जळगाव) येथील युवकांनी स्वीकारले हिंदु राष्ट्राचे बंधन !
रक्षाबंधनच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम !
जळगाव (वार्ता.) – रक्षाबंधनदिनाच्या पार्श्वभूमीवर चिंचपुरा येथील ६० युवकांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु राष्ट्राचे बंधन स्वयंस्फूर्तीने स्वीकारले. या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीच्या वतीने सिद्ध केलेली हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारी राखी सर्र्वांना बांधण्यात आली. समितीच्या वतीने या गावात घेण्यात येणार्या शौर्य जागरण वर्गात सहभागी धर्मप्रेमी युवकांनी स्वतः या कार्यक्रमाची मागणी केली होती. या कार्यक्रमाला समितीचे सर्वश्री प्रशांत जुवेकर, विनोद शिंदे, निखिल कदम आणि जितेंद्र चौधरी हे उपस्थित होते.
४०० वर्षांपूर्वी मावळ्यांनी छत्रपती शिवराय यांच्यासह हिंदवी स्वराज्याचे बंधन स्वीकारले, त्याचप्रमाणे आज प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राचे बंधन स्वीकारणे ही काळाची आवश्यकता आहे. राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात परतवून लावण्यासाठी हिंदु राष्ट्राचे बंधन स्वीकारलेल्या हिंदु राष्ट्र वीरांनी प्रभावीपणे त्यांच्या गावातील हिंदूंचे संघटन करायला हवे, असे मार्गदर्शन या वेळी सुनील घनवट यांनी केले.