सर्व आपण गुरु-प्रिय साधक !

‘प्रत्येक साधकाकडून आपण कोणतातरी गुण नक्कीच शिकतो. ‘त्यांच्यातील गुण, म्हणजे त्यांच्यातील गुरुदेवांचा अंश आहे’, या भावाने गुरुदेवांच्या सर्व आनंदी फुलांप्रती कृतज्ञतास्वरूप आणि विनंतीस्वरूप पुढील काव्य गुरुचरणी अर्पण करते.’

कु. अवनी छत्रे

छोट्या छोट्या गोष्टींना । साहाय्य मागत असते खूप ।
आहे कोण मी । गुरुदेवांची बालसाधक ।। १ ।।

स्वभावदोष अन् अहंशी लढते । शक्ती मागत असते खूप ।
आहे कोण मी । गुरुदेवांची क्षात्रतेजयुक्त साधक ।। २ ।।

जिथे जाते तिथे गाते । गुरुदेवांचे गोडवे खूप ।
आहे कोण मी । गुरुदेवांची प्रसारक साधक ।। ३ ।।

अडचणीत साहाय्य करते । चुकता कुणी सहसाधक ।
आहे कोण मी । गुरुदेवांची उत्तरदायी साधक ।। ४ ।।

समाजातील अपसमज काढते । बनून धर्मप्रेमाचा द्योतक ।
आहे कोण मी ।  गुरुदेवांची वक्ता साधक ।। ५ ।।

असे अनेक साधक असती । परंतु प्रत्येकात असती गुण ।
एकदा स्वतःचे गुण पाहून । होऊया गुणसंपन्न साधक ।। ६ ।।

लढा त्रासांशी वाढवा प्रीती । स्वभावदोष अन् अहं काढून सर्व ।
निघून जातील सर्व बाधा । आता पहा
किती छान आहोत ना । सर्व आपण गुरु-प्रिय साधक ।। ७ ।।

– कु. अवनी छत्रे (वय २१ वर्षे), रायंगिणी, बांदोडा, गोवा. (५.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक