दीड लाख सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – किशोरी पेडणेकर, माजी महापौर

किशोरी पेडणेकर

मुंबई – दीड लाख सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

‘घरोघरी तिरंगा’ या अभियानासाठी मुंबई महानगरपालिकेने ३५ लाख राष्ट्रध्वज खरेदी केले आहेत; मात्र यामध्ये १ लाख ५० सहस्र राष्ट्रध्वज सदोष असल्याचे निदर्शनास आले आहे. कंत्राटदाराने सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करून ध्वजसंहितेचे उल्लंघन केले आहे. ध्वजसंहितेत नमूद केलेल्या नियमानुसार राष्ट्रध्वजाचा आकार, रंगसंगती आणि अशोकचक्र असणे आवश्यक आहे; मात्र कंत्राटदाराकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे.

सदोष राष्ट्रध्वज कंत्राटदाराने परत घेऊन नवीन दिल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

संपादकीय भूमिका

एवढ्या मोठ्या प्रमाणात सदोष राष्ट्रध्वज सिद्ध करून त्यांचा पुरवठा होईपर्यंत त्याविषयी कुणालाच न कळणे हे गंभीर आहे. अशा पाट्याटाकू कंत्राटदारांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांना जरब बसेल !