बिहारमध्ये राम जानकी मंदिराच्या पुजार्याचा शिरच्छेद !
बेतिया (बिहार) – राज्यातील पश्चिमी चंपारण जिल्ह्यातील गोपालपूर येथे बकुलहर मठामध्ये असलेल्या राम जानकी मंदिराच्या पुजार्याचा शिरच्छेद करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. १० ऑगस्टच्या सकाळी राम जानकी मंदिरामध्ये त्यांचे धड रक्ताच्या थारोळ्यात आढळले, तर काही अंतरावर असलेल्या काली मंदिरात एका झोळीत शिर मिळाले. रुदल प्रसाद वर्णवाल असे त्यांचे नाव असून ते ५५ वर्षांचे होते. गेल्या ४० वर्षांपासून ते मंदिरात पूजा करत होते.
#Bihar : Miscreants behead mute #Temple #priest, leave head at another temple’s gatehttps://t.co/uxT6KKvkXA
— TIMES NOW (@TimesNow) August 10, 2022
या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अन्वेषण करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारी झोपले असतांना त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
संपादकीय भूमिका
|