शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
नवी देहली – भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी आणि शहरी नक्षलवादी ८४ वर्षीय वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला. वैद्यकीय कारणास्तव कायमस्वरूपी जामीन मिळवण्यासाठी याआधी वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका फेटाळल्यानंतर राव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वरवरा राव यांचे वय, ढासळलेले आरोग्य आणि कारागृहात आतापर्यंत घालवलेला अडीच वर्षांचा कालावधी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला.
Bhima Koregaon violence accused Varavara Rao granted bail by Supreme Court on ‘medical grounds’: Read detailshttps://t.co/M9Wx7q8Jin
— OpIndia.com (@OpIndia_com) August 10, 2022