घरात ‘कूकर’चा भयानक स्फोट होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जीवितहानी न होणे
‘१३.२.२०२२ या दिवशी मी नोकरीच्या ठिकाणी असतांना जिल्ह्यात चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ शिबिरात सहभागी झाले होतो. त्या दिवशी घरी माझे आई-बाबा आणि भाऊ होते. घरात कूकरचा स्फोट झाला. त्या स्फोटाच्या आवाजामुळे आम्ही रहात असलेली २ माळ्यांची इमारत हादरली. भाऊ बैठकीच्या खोलीतून स्वयंपाकघरात आला आणि त्याने चालू असलेल्या गॅस शेगडीचे बटण बंद केले. त्या वेळी आई स्वयंपाकघरातील देवघराजवळ डोळे बंद करून ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करत होती. एवढा मोठा आवाज झाला, तरीही आईला कशाचीही जाणीव झाली नव्हती. मोठा आवाज झाल्याने शेजारी, वरच्या माळ्यावर रहाणारे लोक आणि घरमालक आमच्या घरी आले.
बाबा स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या दाराबाहेर होते. त्यामुळे ते वाचले. त्या वेळी स्फोटाच्या तडाख्यात कुणीही सापडले असते, तर ते मृत्यूमुखी पडले असते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच कृपेने माझ्या कुटुंबियांचे प्राण वाचले’, याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अजिंक्य खुरसडे, शिवर, अकोला. (१३.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |