‘सजीव-निर्जीव वस्तूंमध्ये देवत्व असून ते साधनेत साहाय्य करतात’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांगणे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना ‘आज मी कोणता भाव ठेवू ?’, असे विचारल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप दिसून त्यात अनंत रूपे दिसणे
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मी त्यांना म्हणाले, ‘आज मी कोणता भाव ठेवू ?’ तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप दिसले. ते आकाशापेक्षाही व्यापक होते. मला त्यांच्यात अनंत रूपे दिसत होती. नंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांना मनातल्या मनात म्हणाले, ‘आपल्या देहात आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमासहित सामावले गेलो आहोत. आता मला सर्व साधक देव वाटत आहेत. आता यापुढे ‘मी काय करू ?’, ते सांगावे.’
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेले प्रश्नाचे उत्तर
‘स्वयंपाकाची सेवा चालू केल्यावर त्यासाठी उपयोगात येणारी सर्व भांडी, साहित्य हे सर्व काय आहेत ?’, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सूक्ष्मातून सांगितले,
अ. ‘सेवेत उपयोगी येणारे आणि सेवा परिपूर्ण करवून घेण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला साधनेत साहाय्य करते. खर्या अर्थाने तेच साधकांकडून प्रारब्ध नष्ट करणारी साधना करवून घेतात. म्हणजेच ते देवस्वरूप आहेत. संत, सहसाधक आणि असे साहित्य यांच्या साहाय्याने आपण आरंभापासून शेवटपर्यंत सेवा परिपूर्ण करू शकतो.’
आ. त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी मला विचारले, ‘आजपासून तुला या सर्वांमधील देवत्वाचे भान झाले आहे ना ?’ त्यावर मी म्हटले, ‘हो परात्पर गुरुदेव.’
तेव्हा माझा भाव जागृत झाला. मी मनातल्या मनात त्या सर्वांना वंदन केले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
– श्रीमती अर्चना लढ्ढा, राजस्थान (२२.९.२०१९)
|