श्री गजानन महाराज, शिर्डी येथील श्री साईबाबा आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात !
कोल्हापूर, ९ ऑगस्ट (वार्ता.) – श्री गजानन महाराज, शिर्डी येथील श्री साईबाबा आणि सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका एकाच वेळी एकाच दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात एकत्र आल्या होत्या. या प्रसंगी सातारा येथील समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांसह अन्य उपस्थित होते.