आतंकवाद्याच्या सुटकेसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त अरब अमिरातच्या दूतावासाला साहाय्य !

केरळमधील सोन्याच्या तस्करीतील आरोपी स्वप्ना सुरेश यांचा गंभीर आरोप

माजी सरकारी अधिकारी स्वप्ना सुरेश यांनी राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या माजी सरकारी अधिकारी स्वप्ना सुरेश यांनी राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् आणि माजी सचिव शिवशंकर यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी एका आतंकवाद्याच्या सुटकेसाठी संयुक्त अरब अमिरातच्या वाणिज्य दूतावासाला साहाय्य केले होते. स्वप्ना सुरेश यांनी यापूर्वीही सोन्याच्या तस्करीमध्ये मुख्यमंत्री विजयन् यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

स्वप्ना सुरेश यांनी दावा केला आहे की, इजिप्तमध्ये जन्मलेला संयुक्त अरब अमिरातचा नागरिक ३० जून २०१७ या दिवशी केरळमध्ये आला होता आणि त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ४ जुलै २०१७ मध्ये अटक केली होती. त्याच्याकडे एक ‘सॅटेलाईट’ दूरभाष सापडला होता, ज्यावर भारतात बंदी आहे. या व्यक्तीची सुटका करण्यासाठी अमिरातच्या वाणिज्य दूतावासाने मुख्यमंत्री विजयन् यांच्याशी बोलणी केली. नंतर त्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणी नंतर कोणतीही चौकशी करण्यात आली नाही.

संपादकीय भूमिका

केंद्रशासनाने या आरोपाकडे गांभीर्याने पाहून याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असेच जनतेला वाटते !