पंजाबमध्ये दोघा खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करणार होते घातपात !
तरणतारण (पंजाब) – येथे गुरविंदर सिंह उपाख्य बाबा आणि संदीप सिंह या दोघा खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक करून त्यांच्याकडून दारूगोळा, २ पिस्तूले आणि अर्धा किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घातपात करण्याच्या प्रयत्नात ते होते. (स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशाला आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागतो, हे लज्जास्पद ! – संपादक) गुरविंदर सिंह हा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्याच्या हत्येतील आरेपी आहे.