पाकमध्ये मंदिरातून परतणार्या हिंदु कुटुंबावर मुसलमानांकडून आक्रमण
पाकमधील असुरक्षित हिंदू !
संघर (पाकिस्तान) – येथे मंदिरातून दर्शन घेऊन परतणार्या एका हिंदु कुटुंबावर क्षुल्लक कारणावरून १२ हून अधिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केली. यासह हिंदूंच्या एका चारचाकीचीही तोडफोड केली. यात दोन जण घायाळ झाले. या कुटुंबात ३ महिला २ मुले आहेत. या वेळी महिलांची छेडही काढण्यात आली.
मंदिर से लौट रहे हिन्दू परिवार पर हमला, महिलाओं से छेड़छाड़: Pak में जहाँ हुई थी हिन्दू कारोबारी की हत्या, वहाँ अब भी नहीं थम रही कट्टरपंथी घटनाएँ#Pakistan https://t.co/Wg8Up7IEwY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 8, 2022
हिंदूंच्या गाडीने मुसलमानांच्या गाडीला ओलांडल्यावर (ओव्हरटेक केल्यावर) ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी सामाजिक माध्यमांद्वारे केली जात आहे.