उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तीन दिवसात बाँबने उडवण्याची धमकी
शाहिद खान नावाच्या मुसलमानाच्या भ्रमणभाषवरून पाठवण्यात आला संदेश
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘३ दिवसांमध्ये बाँबने उडवून देऊ’, असा धमकीचा संदेश सामाजिक माध्यमांद्वारे देण्यात आलो. उत्तरप्रदेशच्या मुख्यालयाच्या ‘११२’ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हा संदेश प्राप्त झाला. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात शाहिद खान नावाच्या मुसलमानाच्या भ्रमणभाषवरून हा संदेश पाठवण्यात आल्याचे समोर आले. आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून लवकरच त्याला पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा आल्या आहेत.
‘Will kill CM Yogi Adityanath in 3 days’: UP police receives death threat on WhatsApp helpline#YogiAdityanath #UttarPradesh https://t.co/o7GA8iu48A
— Zee News English (@ZeeNewsEnglish) August 9, 2022
संपादकीय भूमिकायावरून आरोपींना कुणाचेही भय राहिलेले नाही, हेच लक्षात येते ! हे सरकारी यंत्रणांना लज्जस्पद ! |