रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात केरळमधील कोझीकोडच्या महापौर सहभागी झाल्याने काँग्रेसची टीका
हिंदुद्वेषाची कावीळ झालेली काँग्रेस !
कोझीकोड (केरळ) – काही दिवसांनी असलेल्या श्रीकृष्ण जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित ‘बालगोकुलम्’ या कार्यक्रमात येथील महापौर बीना फिलीप उपस्थित राहिल्याने केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे. यावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने ‘यावरून सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे संगनमत असल्याचे सिद्ध होते’, अशी टीका केली.
#Kozhikode #mayor Beena Philip’s presence in RSS event sparks row.@MSKiranPrakash https://t.co/AwUFhlUnNk@NewIndianXpress
— TNIE Kerala (@xpresskerala) August 9, 2022
या कार्यक्रमात केलेल्या भाषणात फिलीप म्हणाल्या, ‘‘उत्तर भारतात मुलांची काळजी जेवढी चांगली घेतली जाते, तेवढी चांगली काळजी केरळमध्ये घेतली जात नाही. अल्प मृत्यूदर असल्याचा अर्थ ‘बाल संगोपन चांगले आहे’, असा होत नाही. आपण आपल्या मुलांवर उतर भारतियांप्रमाणे प्रेम करायला शिकले पाहिजे. केरळी लोक त्यांच्या मुलांविषयी स्वार्थी आहेत आणि इतर मुलांशी वेगळ्या पद्धतीने वागतात; पण उत्तर भारतात प्रत्येक मुलाची समान काळजी घेतली जाते.’’
सत्ताधारी माकपने महापौरांच्या या विधानाचा निषेध केला.