श्री गुरु दिव्यदर्शन सोहळा अनुभवण्या साधकजन या हो ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
हा सोहळा नसे केवळ पृथ्वीलोकी,
असे अखंड ब्रह्मांडी, साधकजन या हो ।
या सोहळ्याला अनुभवण्या साधकजन या हो ।। धृ ।।
श्री गुरूंची दिव्यता, श्री गुरूंची भव्यता ।
श्री गुरूंची महती पोचविण्या सर्वलोकी साधकजन या हो ।
श्री गुरु दिव्यदर्शन सोहळा अनुभवण्या साधकजन या हो ।। १ ।।
श्री गुरु असे मज आधार, श्री गुरु माझे मायबाप ।
श्री गुरु माझा सखा अन् बंधू, श्री गुरु माझा भगवंत ।।
या गुरूंची भक्ती करण्या,
या गुरूंची महती वर्णाया साधकजन या हो ।। २ ।।
श्री गुरु दिव्य दर्शन सोहळ्यात
साधका उद्धारण्याचे ध्येय ज्यांचे ।
जणू संजीवनीच असे आपत्काळात ही जगण्याची ।
चैतन्य संजीवनी अनुभवण्या साधकजन या हो ।। ३ ।।
साधक, संत अन् सद्गुरु येती, सर्वच श्री गुरुमय होती ।
श्री गुरुमय चैतन्याच्या भवसागरात लीन होण्या या हो ।
श्री गुरु दिव्यदर्शन सोहळा अनुभवण्या, साधकजन या हो ।। ४ ।।
ध्येय ठेवूया श्री गुरुचरणी संपूर्णतः समर्पित होण्याचे ।
या दिव्य सोहळ्यातून क्षणोक्षणी पुढे जाण्याचे ।
गुरूंची कृपा अखंड अनुभवण्यास साधकजन या हो ।। ५ ।।
श्री गुरूंची महती तिन्ही लोक वर्णती ।।
धर्मसंस्थापण्या श्री गुरुरूपी साक्षात् नारायणच अवतरती ।
श्री गुरुरूपातील नारायणा अनुभवण्यास साधकजन या हो ।। ६ ।।
श्री गुरुचरणी समर्पित होऊन श्री गुरुचरणी मुक्त होण्या ।
या श्री गुरुचरणी आश्वस्त होण्या अन् उद्धरण्या ।
श्री गुरु दिव्यदर्शन सोहळा अनुभवण्या साधकजन या हो ।। ७ ।।
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (१.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |