जामिनावर बाहेर आलेल्या धर्मांध गुंडाचे जल्लोषात स्वागत !
गुंडासह ६ धर्मांधांना अटक !
मुंबई – कारागृहातून जामिनावर बाहेर आल्याने धर्मांध गुंड दरवेझ महंमद सय्यद आणि त्याचे साथीदार यांनी रस्त्यावर गाडीत मोठ्या आवाजात गाणी वाजवत फटाके फोडून जल्लोष केला. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याप्रकरणी पोलिसांनी या गुंडासह त्याच्या ६ साथीदारांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुंड ८ मास आर्थर रोड कारागृहात होता.