आज होणार मंत्रीमंडळाचा विस्तार !
सकाळी ११ वाजता शपथविधी !
मुंबई – महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ देणार आहेत.
भाजपमधील चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यांनी, तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, सदा सरवणकर यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपक्ष आमदारांतील बच्चू कडू आणि रवी राणा यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.