पू. माधव सदाशिव गोळवलकरगुरुजी यांनी काँग्रेसच्या तत्कालीन पुढार्याला फाळणीविषयी दिलेले सडेतोड उत्तर
१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताचा ७५ वा ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘रेल्वे प्रवासात पू. गोळवलकर गुरुजींच्या सहप्रवासात काँग्रेसचे तत्कालीन एक पुढारी होते. गप्पा चालल्या असतांना ते पुढारी गुरुजींना म्हणाले, ‘‘हिंदू आणि मुसलमान हे बंधू आहेत. भावाभावांमध्ये वाटणी करतात, तशी ही वाटणी (हिंदुस्थान आणि पाकिस्तान) झाली, तर त्यात एवढे काय वावगे आहे ?’’ त्या वेळी त्या दोघांमध्ये झालेली प्रश्नोत्तरे अशी –
गुरुजींनी तो विषय सोडून पुढार्याला विचारले,
गुरुजी : काय हो ! कुणी एखाद्याची हत्या केली, तर त्याला काय शिक्षा ?
पुढारी : त्याला फाशी दिली पाहिजे !
गुरुजी : पण जर एखाद्याने आपल्या जन्मदात्या आईचाच गळा कापला, तर त्याला काय शिक्षा द्यावी ?
पुढारी : त्या नराधमाला अगदी फासावरच लटकवले पाहिजे !
गुरुजी : खरे ना ? मग आमच्या कोट्यवधी भारतियांची माता असणारी ही भारतमाता चिरणार्यांना काय शिक्षा द्यावी ?
यावर काँग्रेसचा तो पुढारी निरुत्तर झाला.
(साभार : मासिक ‘प्रज्ञालोक’, एप्रिल २०१९)