श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्रावण मासातील दुसर्या सोमवारी (दिनांक ८ ऑगस्ट) असलेल्या पुत्रदा एकादशीनिमित्त पहाटेपासून चंद्रभागा नदीवर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पंढरपूर येथे येऊन लाखो भाविकांनी पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या चरणांवर भावपूर्ण माथा टेकला.