कळवा येथे मदरशातील मारहाणीला कंटाळून ५ मुलांचे पलायन !
ठाणे, ८ ऑगस्ट (वार्ता.) – कळवा येथील मदरशातील शिक्षकाकडून होणार्या मारहाणीच्या जाचाला कंटाळून ५ मुले पळून गेली. कळवा रेल्वे स्थानकाकडून कल्याणच्या दिशेने जाणार्या लोकलमध्ये १२ ते १४ वर्षांची अल्पवयीन मुले घाबरलेल्या स्थितीत एका महिला प्रवाशाला दिसली. त्यांच्या चर्चेतून त्यांच्या समवेत काहीतरी चुकीचे वर्तन झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने रेल्वे नियंत्रण कक्षाला संपर्क करून याविषयी माहिती दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या पाचही मुलांना उतरवून त्यांची चौकशी केली असता ही मुले मदरशातील शिक्षकाकडून होणार्या मारहाणीला कंटाळून त्यांच्या बिहार येथील मूळ गावी जात असल्याचे समजले. या प्रकरणी मदरशातील शिक्षकाच्या विरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाहे आहे मदरशांचे वास्तव ! मुलांचा छळ करणार्या अशा मदरशांवर बंदीच घालायला हवी ! |