रावणालाही असाच अहंकार होता ! – नवोदिता घाटगे, भाजप
कागल (जिल्हा कोल्हापूर) – रावणालाही असाच अहंकार होता. त्यामुळे कागलची जनता ठरवेल की, त्यांना रामराज्य हवे आहे कि नको ? असे प्रत्युत्तर भाजपचे नेते समजरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांनी दिले आहे. ‘मला पराभूत करणारा अजून जन्माला यायचा आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना उद्देशून केले होते. यावर नवोदिता घाटगे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते प्रकाश गाडेकर यांनी नवोदिता घाटगे यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कागल येथे मोर्चा काढण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.