हिंदुद्रोही निर्माता-दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या भित्तीपत्रकावरील ‘सॅनिटरी पॅड’वर भगवान श्रीकृष्णाचे चित्र दाखवल्याचे प्रकरण !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदी चित्रपट ‘मासूम सवाल’च्या भित्तीपत्रकावरील ‘सॅनिटर पॅड’च्या पार्श्वभूमीवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र दाखवल्याच्या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘हिंदु राष्ट्र नवनिर्माण सेने’चे संस्थापक अमित राठोड यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. यात उपाध्याय यांच्यासह ‘नक्षत्र २४ मीडिया प्रा.लि.’, तसेच अन्य काही जणांची नावे आहेत. या सगळ्यांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे.
(म्हणे) ‘फाशी दिली, तरी क्षमा मागणार नाही !’ – निर्माता-दिग्दर्शक संतोष उपाध्याय
‘मैसेज’ के लिए ‘मुरली वाले’ का अपमान क्यों? फिल्म के डायरेक्टर ने बताई वजह #MasoomSawal @ramm_sharma pic.twitter.com/qTzymTi5pF
— Zee News (@ZeeNews) August 4, 2022
या संदर्भात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलतांना संतोष उपाध्याय यांनी म्हटले की, या भित्तीपत्रकावरून वाद निर्माण होण्याची मला अपेक्षा नव्हती; कारण यात वाद निर्माण करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. (येथे हेतूचा प्रश्न नसला, तरी लोकांच्या धार्मिक भावनांचा प्रश्न आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली कुणाच्याही धार्मिक भावना दुखावता येऊ शकत नाहीत ! – संपादक) माझा चित्रपट व्यावसायिक नाही, तर संदेश देणारा आहे. या चित्रपटात मासिक पाळीच्या वेळी देवतांच्या प्रतिमेला हात लावता येऊ शकतो, असे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात ‘मासिक पाळी अशुभ नाही’, असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मला फाशी दिली, तरी मी यासाठी क्षमा मागणार नाही. (संतोष उपाध्याय यांना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते अशा प्रकारचे मत मांडत आहेत आणि त्याच्या आधारेच त्यांनी हा चित्रपट बनवला आहे. जर त्यांनी हिंदु धर्माचा अभ्यास केला असता, तर मासिक पाळीमुळे आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो, हे त्यांच्या लक्षात आले असते ! – संपादक)