आरोपींवर कारवाई झाली नसल्याने हिंदु महिलेचे गावातून पलायन करण्याची चेतावणी
पिलीभित (उत्तरप्रदेश) येथे वासराची चोरी करून हत्या केल्याचे प्रकरण
पिलीभित (उत्तरप्रदेश) – येथील रसिया खानपूर गावातील महिला कृष्णा देवी यांच्या गायीचे वासरू आबिद, रईस, जिलेदार आणि मुन्ने खान यांनी चोरून त्याची हत्या केली. याविषयी न्याय न मिळाल्याने कृष्णा देवी यांनी १० ऑगस्ट या दिवशी गावातून पलायन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात त्यांनी घराबाहेर भित्तीपत्रकही लावले आहे. वासराची चोरी आणि हत्या या प्रकरणी गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.
पीलीभीत: बछड़े की हत्या का FIR दर्ज करानेवाली महिला ने दी थी पलायन की धमकी https://t.co/h4wbHsH0zw
— khabari24.Com (@khabari24news) August 7, 2022
कृष्णा देवी यांनी, ‘११ ऑगस्ट या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आरोपींनी मला ठार मारण्याची धमकी दिली. जर मला किंवा माझ्या कुटुंबियांना काही झाले, तर त्याचे दायित्व पोलिसांचे असेल’, अशी चेतावणी दिली आहे.
संपादकीय भूमिका‘उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना कशी घडते ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! |