मुंबईतील ‘आर्.डी. नॅशनल’ महाविद्यालयाच्या उपाहारगृहातील ‘हलाल’चे फलक प्राध्यापकांनी काढायला लावले !
मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) – वांद्रे (मुंबई) येथील शासकीय अनुदानित ‘आर्.डी. नॅशनल’ महाविद्यालयाच्या उपाहारगृहात (‘कँटीन’मध्ये) ‘१०० टक्के हलाल’ असे फलक लावण्यात आले होते. याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या विरोधानंतर उपाहारगृहाच्या मालकांनी हे फलक काढून टाकले. विशेष म्हणजे उपाहारगृहाचे मालक सिंधी समाजाचे असूनही केवळ मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने त्यांनी उपाहारगृहात हलालचे फलक लावले होते.
१. या उपाहारगृहात आतमध्ये आणि बाहेर अशा २ ठिकाणी हलालचा फलक लावण्यात आल्याचे महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. आकाश परदेशी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका डॉ. (सौ.) किरण जठार यांच्या निदर्शनास आणून दिला.
२. त्यानंतर डॉ. (सौ.) किरण जठार यांसह प्रा. डॉ. लक्ष्मण जठार, प्रा. डॉ. मुकेश कनोजिया, प्रा. (सौ.) नम्रता अजवाणी, प्रा. (श्रीमती) शोभा बभांनी, तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी सर्वश्री आकाश परदेशी, रमेश वर्मा आणि मनोज साबळे या सर्वांनी एकत्रित जाऊन याविषयी उपाहारगृहाचे मालकांना विचारणा केली.
३. ‘कुणाचीही अनुमती न घेता हलालचा फलक लावून खाद्यपदार्थांची विक्री तुम्ही कुणाच्या अनुमतीने करत आहात ?’, याविषयी सर्वांनी उपाहारगृहाच्या मालकांना विचारणा केली. त्यावर उपहारगृहाच्या मालकांनी या भागातील बहुतांश विद्यार्थीं आणि त्यांचे पालक मुसलमान असल्याने त्यांच्यासाठी हे फलक लावल्याचे म्हटले.
४. त्यावर उपमुख्याध्यापिका डॉ. (सौ.) किरण जठार यांनी कठोर शब्दांत खडसावले, ‘‘हे महाविद्यालय शासकीय आहे. तुम्ही एका विशिष्ट समुदायासाठी असा फलक लावून खाद्यपदार्थांचे वितरण करू शकत नाही. पुन्हा असे काही आढळल्यास तुमचे महाविद्यालयातील उपाहारगृहाचे कंत्राट रहित करू.’’
५. त्यावर ‘पुन्हा अशी चूक होणार नाही’, अशी क्षमायाचना करत मालकांनी उपाहारागृहात लावलेले हलालचे फलक काढून टाकले.
संपादकीय भूमिकाकेवळ मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुर्लक्षित करण्याचा प्रकार होय. या विरोधात खडसावणारे महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे अभिनंदन ! |