नागपूर येथे भूतबाधेच्या शंकेतून आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू !
आई-वडिलांसह नातेवाइकाला अटक !
नागपूर – स्वतःच्या ६ वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेतून आई-वडिलांनी तिला पुष्कळ मारहाण केल्याने मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे (वय ४५ वर्षे), आई रंजना (४२ वर्षे) आणि मावशी प्रिया बनसोड (वय ३२ वर्षे) यांना अटक केली आहे. ही घटना ६ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
नागपूर: भूतबाधा झाल्याच्या संशयातून आई वडिलांनी 6 वर्षीय चिमुकलीला जबर मारहाण त्यात तिचा मृत्यू. https://t.co/7Ptf9rhtsS
— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) August 7, 2022
संपादकीय भूमिकाअशा घटना न घडण्यासाठी समाजातील लोकांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! |