रा.स्व.संघाच्या पदाधिकार्यावर आक्रमण; सय्यद वसीम याला अटक !
कोलार (कर्नाटक) – येथील मालुरु क्षेत्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष आणि कोलार जिल्हा सचिव श्री. रवि यांच्यावर सय्यद वसीम नावाच्या धर्मांध मुसलमानाने चाकूद्वारे आक्रमण केले. यामध्ये रवि घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संघ आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी मालुरु येथे ६ ऑगस्ट या दिवशी निषेध आंदोलन केले.
RSS worker attacked in Malur; 1 held https://t.co/KoMWUnw8oy
— TOI Bengaluru (@TOIBengaluru) August 7, 2022
येथील मारिकांबा मंदिराजवळ रवि यांचे दुकान आहे. तेथे सय्यद वसीम आणि अन्य एकामध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी रवि मध्ये पडले असता वसीम त्यांनाच अपशब्द बोलू लागला आणि चाकूद्वारे त्यांच्यावर आक्रमण केले. रवि यांनी मालुरु पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून वसीम याला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भारतात असुरक्षित असलेले हिंदूंचे नेते ! हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय ! |