राजस्थानमध्ये धर्मांध सासर्याकडून स्वतःची गर्भवती मुलगी आणि हिंदु जावई यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न !
हिंदु मुलाशी विवाह करण्याला होता विरोध !
भरतपूर (राजस्थान) – येथे इस्लाम खान नावाच्या एका पित्याने स्वतःच्याच गर्भवती मुलीसह हिंदु जावयाला गाडीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमागे मुलीचे लग्न हिंदु तरुणाशी झाल्याचे कारण सांगितले जात आहे. या प्रकरणी इस्लाम खानच्या विरोधात त्याची मुलगी नगमा खान आणि जावई नरेंद्र सैनी यांनी भरतपूरमधील मथुरा गेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
#WATCH | Rajasthan: Father of a Muslim woman who married a Hindu man in Bharatpur,attempted to harm the couple with his autorickshaw
The Hindu man says, “He attempted to kill us with his auto.He was locked up but continued threatening us. We’re seeking protection”
(Source:CCTV) pic.twitter.com/xN67uCKpfo
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 4, 2022
नगमा आणि नरेंद्र यावर्षी फेब्रुवारीमध्ये विवाहबद्ध झाले होते. नरेंद्र हिंदु असल्याने इस्लाम खान यांचा या विवाहाला विरोध होता. लग्न झाल्यापासून तो त्यांना धमक्या देत होता. २८ जुलै २०२२ या दिवशी रिक्शाचालक असलेल्या इस्लाम खान याने नरेंद्र आणि नगमा ज्या दुचाकीवरून जात होते, त्या दुचाकीला धडक दिली आणि त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्याने रिक्शा त्या दोघांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या घटनेनंतर इस्लाम खान पळून गेला. नरेंद्र याने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदूंना ‘प्रेमाला रंग नसतो’, असा फुकाचा सल्ला देणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ? |