चाफळ विभागात १५ घरफोड्या !
सातारा – चाफळ विभागातील खालची आणि वरची जाळगेवाडी, माथनेवाडी, गमेवाडी आणि माजगाव या ५ गावांमध्ये एका रात्रीत १५ ठिकाणी घरफोड्या झाल्या. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड आणि त्यांचे सहकारी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच सातारा गुन्हे अन्वेषण विभाग आणि ठसे तज्ञ विभाग यांनाही पाचारण करण्यात आले. घरफोड्या करणार्या गुन्हेगारांच्या अन्वेषणासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित चाफळ ! |