नाशिक येथील १८ अनधिकृत शाळांना टाळे ठोकण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !
संबंधित शाळांमध्ये प्रवेश न घेण्यासाठी नोटीस
नाशिक – येथील १८ अनधिकृत शाळांना टाळे ठोकण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, याची नोटीसही गट गटशिक्षणाधिकार्यांनी बजावली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळा चालू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची अनुमती घेणे आवश्यक आहे; मात्र शाळा चालू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला देऊन मान्यता मिळवण्यापूर्वीच वर्ग भरवले जातात.
संपादकीय भूमिका१८ अनधिकृत शाळा निर्माण होईपर्यंत शिक्षण विभाग आणि प्रशासन काय करत होते ? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणार्या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी ! |