नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न
१. गुरुकृपायोगानुसार अष्टांगयोगाने साधना करण्याची शिकवण मिळणे
‘मी नोकरीत असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि श्री. प्रशांत कुलकर्णी यांच्या अनमोल सत्संगातून गुरुदेवांची शिकवण, साधनेतील बारकावे अन् ‘प्रेमभाव वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे माझ्या मनावर बिंबले.
२. साधनेचे महत्त्व कळल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेऊन साधना करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अध्यात्मप्रसार करणे
साधनेचे महत्त्व आणि होणारे लाभ मनावर ठसल्यामुळे मी वर्ष २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन साधना करण्यास प्रवृत्त झालो. मला ईश्वरी अनुसंधानात रहाता येऊ लागले. ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि संतांचे महत्त्वपूर्ण लेख, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय यांचा अभ्यास करून मी समाजामध्ये प्रबोधन करू शकलो. त्याचप्रमाणे मी जिज्ञासूंना साधना करण्यास प्रवृत्त करून धर्मकार्यासाठी जोडू शकलो.
३. ‘पोहणे’ या कलेचा उपयोग करून जलतरण तलावातील १०० जिज्ञासूंना सनातनशी जोडणे
‘कलेसाठी कला नाही, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हा दृष्टीकोन परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वीच दिला. त्यामुळे मला ‘पोहणे’ या कलेचा उपयोग करून जलतरण तलावातील १०० जिज्ञासूंना सनातनशी जोडण्यात दैवी साहाय्य लाभले.
– श्री. अनिल पाटील (वय ७६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), नाशिक (२७.०३.२०२२)