संपूर्ण घरपट्टी भरलेल्या नागरिकांना विनामूल्य राष्ट्रध्वज !
सातारा – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने ज्या मिळकतधारकांनी १ एप्रिल २०२२ या दिवसापासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे, त्यांना विनामूल्य राष्ट्रध्वज देण्यात येणार आहेत, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘ज्या नागरिकांनी १ एप्रिल २०२२ पासून आपली घरपट्टी भरलेली आहे, त्यांनी नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातून घरपट्टी भरलेले देयक दाखवून विनामूल्य राष्ट्रध्वज घेऊन जावेत. ज्यांना राष्ट्रध्वज विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनीही वरील ठिकाणी २५ रुपये भरून राष्ट्रध्वज विकत घ्यावेत. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज फडकवायचे आहेत.’’