हत्येनंतर आरोपींनी ‘बिर्याणी’च्या मेजवानीचे आयोजन केले !
-
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण
-
आणखी २ आरोपी अटकेत !
मुंबई – अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुशफीक अहमद आणि अब्दुल अरबाज यांना अटक केली आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय.ए. न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्या दोघांवर या हत्याकांडातील अन्य आरोपींना साहाय्य करणे आणि हत्येनंतर ‘बिर्याणी’च्या मेजवानीचे आयोजन करणे, असे गंभीर आरोप आहेत. आतापर्यंत या प्रकरणात ७ आरोपींना अटक करण्यात आली होती. आता वरील दोघांना अटक केल्यानंतर अटकेतील आरोपींची एकूण संख्या ९ झाली आहे.
NIA ने बताया है कि मौलवी मुशफीक अहमद और अब्दुल अरबाज ने उमेश कोल्हे को मौत के घाट उतारने के बाद बिरयानी पार्टी का आयोजन किया था।#umeshkolhe #Radical_Islam https://t.co/BoA6LeTyO6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 6, 2022
मुशफीक अहमद हा मौलवी असून अब्दुल अरबाज हा एका अशासकीय संस्थेतील रुग्णवाहिकेचा चालक आहे.
संपादकीय भूमिकायावरून ‘धर्मांधांना पोलीस, कायदा, सरकार आदी कशाचेच भय नाही’, हेच सिद्ध होते ! अशांना सरकारने फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केल्यासच इतरांवर वचक बसेल ! |