श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्टला सांगली येथे ‘इतिहास अभ्यासवर्ग’ !
सांगली, ६ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रजीवन सदैव रसरशीत आणि तेजस्वी ठेवण्यासाठी देवघरातील नंदादीपासारखी समाजमनाची सतत तेलवात करावी लागते. त्यासाठीच प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी सांगली येथील धनंजय गार्डन, कर्नाळ रस्ता येथे ‘इतिहास अभ्यासवर्गा’चे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गात विटा येथील श्री. अभयकुमार भंडारी, भारताचार्य श्री. सु.ग. शेवडे, पुणे येथील इतिहास संशोधक श्री. शिवराम कार्लेकर यांसह अन्य तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
हा अभ्यासवर्ग १३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता चालू होईल आणि १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजता संपेल. अभ्यासवर्गासाठी येणार्या प्रत्येकाने पांघरूण, स्नानाचे कपडे, लेखणी, वही, नेहमीचा वेष आणि डोक्यावरती पांढरी टोपी आणावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नगरप्रमुख श्री. अविनाश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.